Sunil Chhetri Retires From International Football: भारतीय फुटबॉलचा आयकॉन सुनील छेत्री याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. भारतीय फुटबॉल संघाचा सामना आज म्हणजेच, 6 जून रोजी कुवेतशी झाला. हा सामना टीम इंडियाचा कर्णधार सुनील छेत्रीचा शेवटचा सामना होता. सुनील छेत्रीने या सामन्यापूर्वीच घोषणा केली होती की, हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. दोन्ही संघांमधील हा सामना अनिर्णित राहिला. कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर फिफा विश्वचषक पात्रता 2026 च्या या सामन्यात दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. यासोबतच भारतीय फुटबॉलचा एक महत्त्वाचा अध्यायही संपला.
सुनील छेत्रीचा जन्म 3 ऑगस्ट 1984 रोजी सिकंदराबाद येथे झाला. सुनील छेत्री हा भारतीय फुटबॉलचा महत्त्वाचा भाग होता. आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यांच्या यादीत तो सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. सुनील छेत्रीने 12 जून 2005 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. या सामन्यातच त्याने पहिला आंतरराष्ट्रीय गोलही केला. छेत्रीने त्याच्या शानदार कारकिर्दीत सहा वेळा एआयएफएफ प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला. याशिवाय त्यांना 2011 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2019 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. (हेही वाचा: Norway Chess: आर प्रज्ञानंदची जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर धडक, क्लासिकल चेसमध्ये अभिमानास्पद कामगिरी)
पहा पोस्ट-
Indian football icon Sunil Chhetri retires from international football as the sport's fourth highest goal-scorer
— Press Trust of India (@PTI_News) June 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)