Paris Paralympics 2024: पॅरा ॲथलीट शीतल देवी हिने पॅरिस पॅरालिम्पिकच्या पहिल्या दिवशी तिरंदाजीमध्ये भारताला आनंदाची संधी दिली. गुरुवारी महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजीची पात्रता फेरी पार केली. तिरंदाजीत तिने विक्रमी 703 गुणांची कमाई केली. शीतल देवीने दुसरे स्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले. शीतलने आणखी एक गुण मिळवला असता तर तिने अव्वल स्थान पटकावले असते आणि विश्वविक्रम केला असता. तुर्कीचा क्युरी गिरडी पहिली राहिली. तिने 704 गुण मिळवून विश्वविक्रम केला. तर, सरिता कुमारी 682 गुणांसह 9व्या स्थानावर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)