मलेशिया ओपन सुपर 750 (Malaysia Open Super 750) स्पर्धा यजमान देशातील कोविड-19 च्या वाढीमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. यामुळे लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि अव्वल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत (Kidambi Srikanth) यांच्या टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) पात्रतेला फटका बसला आहे. मलेशिया ओपन ही स्पर्धा अखेरच्या दोन ऑलिम्पिक पात्रता स्पर्धांपैकी एक होती. 25 ते 30 मे दरम्यान क्वालालंपूरमध्ये ऑलिम्पिक पात्रता म्हणून स्पर्धा आयोजित करण्यात येणार होती.
Tournament organisers Badminton Association of Malaysia and Badminton World Federation have jointly agreed to postpone the CELCOM AXIATA Malaysia Open 2021, scheduled for 25-30 May 2021.#BWFWorldTourhttps://t.co/SGTrcL2w2d
— BWF (@bwfmedia) May 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)