रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadega) शानदार फलंदाजीनंतर भारतीय संघाने (Team India) मालिकेतील दुसऱ्या T20 (IND vs ENG 2nd T20I) सामन्यात इंग्लंडचा (Eng) 49 धावांनी पराभव केला. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर शनिवारी झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली. जडेजाच्या नाबाद 46 धावांच्या खेळीमुळे भारताने 20 षटकांत 8 बाद 170 धावा केल्या. यानंतर इंग्लिश संघ 17 षटकांत 121 धावा करून ऑलआऊट झाला. त्यामुळे भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना रविवार, 10 जुलै रोजी होणार आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजाने 29 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 46 धावा केल्या. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने 3 बळी घेतले. संघात पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने 2-2 बळी मिळवले. हर्षल पटेल आणि हार्दिक पंड्यानेही 1-1 असे यश मिळवले.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)