PKL Kabaddi 10: प्रो कबड्डी लीगच्या सीझन 10 च्या पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्स आणि तेलुगू टायटन्स (Gujarat Giants Beat Telugu Titans) आमनेसामने होते. गुजरात जायंट्सने तेलुगू टायटन्सचा 6 गुणांच्या फरकाने पराभव करत विजयाने सुरुवात केली. पूर्वार्धात तीन गुणांनी पिछाडीवर पडल्यानंतर सोनू जगलानच्या सुपर रेडने गुजरात जायंट्सला उत्तरार्धात पुनरागमन करण्याची संधी दिली. सोनूने आपल्या सुपर रेडमध्ये 5 गुण मिळवले. तेलुगू टायटन्सचा स्टार खेळाडू आणि कर्णधार पवन सेहरावत काहीही चांगले करू शकला नाही आणि सुमारे 15 मिनिटे मॅटच्या बाहेर राहिला, ज्यामुळे त्याच्या संघाला परिणाम भोगावे लागले. तेलुगू टायटन्सच्या बचावफळीची कामगिरी खराब झाली. प्रवेश भैंसवाल पूर्णपणे अपयशी ठरला. सोनू जगलानने पीकेएल सीझन 10 चा पहिला सुपर 10 देखील पूर्ण केला. (हे देखील वाचा: India vs Australia: टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच केला हा मोठा पराक्रम)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)