या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये (Australian Open) राफेल नदालने (Rafael Nadal) प्रथमच एक सेट गमावला परंतु शुक्रवारी करेन खाचानोववर मात केली आणि चौथ्या फेरीत प्रवेश करण्यासाठी दुखापतीनंतरचा सर्वोत्तम सामना खेळला. 20 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नदालने रॉड लेव्हर एरिना येथे रात्री उशिरापर्यंत चाललेल्या सामन्यात 2 तास 50 मिनिटांत 6-3, 6-2, 3-6, 6-1 असा विजय मिळवला आणि त्याचा सामना अंतिम 16 च्या फेरीत रशियाच्या 18व्या मानांकित अस्लन कारातसेव किंवा फ्रेंच खेळाडू अॅड्रियन मॅनारिनो यांच्याशी होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)