सिफ्ट कौर समरा, आशी चौकसे, मानिनी कौशिक यांनी हँगझोऊ येथे महिलांच्या 50 मीटर रायफल 3P स्पर्धेत दुसरे स्थान प्राप्त करत भारताने आशियाई खेळ 2023 मध्ये त्यांचे 15 वे पदक आणि पाचवे रौप्यपदक जिंकले आहे. नेमबाजी संघाने आता त्यांचे सहावे पदक जिंकले आहे आणि त्यांनी 2018 मध्ये जकार्ता येथे जिंकलेल्या नऊ पदकांच्या संख्येच्या जवळपास पोहोचले आहे.

दरम्यान भारताने या प्रकारत 1764 गुण प्राप्त केले जे पहिल्या क्रमांकावरील चीन पेक्षा 9 ने कमी आहे. कोरियाने या ठिकाणी ब्रांझ मेडलची कमाई केली.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)