Viral Video: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या (Surya Kumar Yadav) बॅटने धमाका पाहायला मिळाला. त्याच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने शेवटच्या सामन्यात 91 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर लेगस्पिनर युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) सूर्यकुमारसोबत असे काही केले, ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. या दोन खेळाडूंशी संबंधित एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लेगस्पिनर युझवेंद्र चहलने सामन्यानंतर सूर्यकुमार यादवचे कौतुक केले आणि यादरम्यान व्हिडीओमध्ये चहलने प्रथम सूर्यकुमारच्या हातांचे एक-एक चुंबन घेतले आणि त्याच्या दोन्ही डोळ्यांना स्पर्श केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला असुन मोठ्याप्रमाणात तो व्हायरल होत आहे.
पहा व्हिडीओ
— Guess Karo (@KuchNahiUkhada) January 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)