महिला प्रीमियर लीग (WPL 2023) ला पहिला चॅम्पियन मिळाला आहे. रविवारी रात्री झालेल्या रोमांचक फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्स संघाने निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 131 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून कर्णधार मेग लॅनिंगने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाने 19.3 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. सामन्यातील 19 वे षटक हे टर्निंग पॉइंट ठरले. नताली सायव्हर ब्रंटने नाबाद अर्धशतक झळकावत मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
𝗣𝗥𝗘𝗦𝗘𝗡𝗧𝗜𝗡𝗚 𝗧𝗛𝗘 𝗠𝗔𝗜𝗗𝗘𝗡 𝗖𝗛𝗔𝗠𝗣𝗜𝗢𝗡𝗦 𝗢𝗙 #𝗧𝗔𝗧𝗔𝗪𝗣𝗟!
CONGRATULATIONS @mipaltan 👏👏#TATAWPL | #DCvMI | #Final pic.twitter.com/2NqPLqk9gW
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)