Bhuvneshwar Kumar भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे किंवा तो लवकरच घेईल. खरं तर, 33 वर्षीय भुवनेश्वर कुमारने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम बायोमधून क्रिकेटर हा शब्द काढून टाकला आहे. भुवनेश्वरच्या इन्स्टा बायोमध्ये आधी 'भारतीय क्रिकेटर' असे लिहिले होते पण आता ते काढुन टाकले आहे. भुवनेश्वरने जानेवारी 2022 मध्ये पार्लमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता, जिथे त्याला 8 ओव्हरमध्ये एकही विकेट मिळाली नव्हती. तेव्हापासून दुखापती आणि खराब फॉर्ममुळे तो एकदिवसीय संघातून बाहेर पडला आहे. त्याच वेळी, भुवनेश्वर देखील नोव्हेंबर 2022 मध्ये टी-20 विश्वचषक संघाचा एक भाग होता, जिथे त्याने चार सामने खेळले आणि तीन विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)