IPL 2024: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) अवस्था बिकट असून चाहते सूर्यकुमार यादवची (SuryaKumar Yadav) वाट पाहत आहेत. सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये कधी खेळणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्या अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे तो काही सामने खेळू शकणार नाही. स्पोर्ट्स हर्नियाच्या शस्त्रक्रियेतून सूर्या अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. एनसीएमध्ये त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जात आहे. मुंबई इंडियन्सला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) सूत्राने सांगितले की, सूर्या खूप चांगली प्रगती करत आहे आणि लवकरच मुंबई इंडियन्ससाठी पुनरागमन करेल. मात्र, पहिल्या दोन सामन्यात न खेळल्याने त्याला आणखी काही सामन्यांमधून बाहेर राहावे लागू शकते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)