IND vs SL: टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली पहिल्या एकदिवसीय सामन्यात फ्लॉप ठरला आणि काही विशेष करू शकला नाही. अशा स्थितीत दुसऱ्या वनडेत कोहलीच्या बॅटमधून धावा येतील अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही आणि विराट कोहली एलबीडब्ल्यू आऊट झाला. पण सामन्यात एक क्षण असा आला जेव्हा विराट कोहलीला अंपायरने आऊट दिला पण त्यानंतर विराटने डीआरएस घेतला. डीआरएसने विराट कोहलीला वाचवले पण यादरम्यान श्रीलंकेच्या कॅम्पमध्ये चांगलाच गोंधळ झाला. श्रीलंकेच्या खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला विराट कोहली बाद झाल्याची खात्री पटली पण डीआरएसने त्याला नाबाद दिले आणि त्यावरुन भर मैदानात झाला फुल ऑन ड्रामा पाहायला मिळाला.
पाहा व्हिडिओ
— hiri_azam (@HiriAzam) August 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)