भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना (India vs West Indies 4th T20I) आज, 6 ऑगस्ट रोजी फोर्ट लॉडरहिल, फ्लोरिडा, यूएसए येथे खेळला जात आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यर यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले असून त्यांच्या जागी रवी बिश्नोई, अक्षर पटेल आणि संजू सॅमसन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), संजू सॅमसन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह

वेस्ट इंडिज संघ

ब्रँडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, डेव्हॉन थॉमस (विकेटकिपर), जेसन होल्डर, डॉमिनिक ड्रेक्स, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)