गुरूवारी झालेल्या टी-20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा (Team India) इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव झाला. रोहितच्या संघाला इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर अनेक भारतीय चाहत्यांनी भारतीय संघाल ट्रोल केलं तर काही जण भारतीय संघाच्या पाठीशी उभे राहिले. या सगळ्या गोष्टीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला "आम्ही आमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियन किनारा सोडत आहोत आणि आमच्या अंतःकरणात निराशा आहे, परंतु आम्ही एक गट म्हणून अनेक अविस्मरणीय क्षण परत घेत आहोत आणि येथून चांगले होण्याचे ध्येय आहे. धन्यवाद. आमचे सर्व चाहते जे मोठ्या संख्येने आम्हाला स्टेडियममध्ये पाठिंबा देण्यासाठी आले. ही जर्सी परिधान करून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा नेहमीच अभिमान वाटतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)