विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 विश्वचषक 2022 मध्ये इतिहास रचला आहे. भारतीय स्टारने बुधवारी बांगलादेशविरुद्ध खेळताना महेला जयवर्धनेला मागे टाकून T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा (Most Runs in T20 World Cups) खेळाडू बनला. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 धावा करून कोहलीने या स्पर्धेत 1000 धावांच्या क्लबमध्ये प्रवेश केला. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागला. विराटला श्रीलंकेचा दिग्गज महेला जयवर्धनेला मागे सोडण्यासाठी फक्त 16 धावांची गरज होती. बांगलादेशविरुद्ध अॅडलेडमध्ये टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी उतरली. रोहित शर्मा स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर विराट कोहली क्रीजवर आला. त्याने अल्पावधीतच 16 धावा करून जयवर्धनेला मागे सोडले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)