अफगाणिस्तान U19 क्रिकेट संघाने (Afghanistan Cricket Team) जबरदस्त लढा देऊन श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka( चुरशीच्या सामन्यात विजय मिळवला आणि आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वचषक (U19 Cricket World Cup) 2022 च्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. आपल्या सामर्थ्याचे यशस्वी प्रदर्शनानंतर त्यांनी मैदानावरच जल्लोष साजरा के केला. एकमेकांचे अभिनंदन व आभार मानून उत्सवाची सुरुवात केली. यानंतर, संपूर्ण टीमने एक गोल करून अफगाणिस्तानचे पारंपारिक नृत्य ATTAN सादर केले. आणि का करू नये त्यांनी प्रथमच उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंचा हा जल्लोष, त्यांच्या सर्व आनंदाची झलक या नृत्यातून स्पष्टपणे झळकते.

ATTAN नाच

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)