टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना (WTC Final 2023) खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळला जात आहे. टीम इंडिया दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे संघ या दिग्गजांसह मैदानात उतरत आहेत. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने तीन गड्यांच्या मोबदल्यात 150 धावाच्या पुढे आहे तर ट्रॅव्हिस हेडने आपले अर्धशतक पुर्ण केले आहे.
A brilliant attacking innings from Travis Head 🔥
Follow the #WTC23 Final 👉 https://t.co/wJHUyVnX0r pic.twitter.com/KwXitedrRY
— ICC (@ICC) June 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)