RCB vs SRH: सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक खेळाडू ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध (SRH vs RCB) तुफान खेळी केली आहे. हेडने बेंगळुरूविरुद्ध शानदार शतक झळकावले आहे. हैदराबादसाठी ट्रॅव्हिस हेड सलामीला आला आणि तो येताच त्याने बेंगळुरूच्या गोलंदाजांना झोडपायला सुरुवात केली. त्याने एकाही गोलंदाजाला सोडले नाही. ट्रॅव्हिस हेडने 39 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि यासह तो आयपीएलच्या इतिहासातील चौथे जलद शतक झळकावणारा (Travis Head Century) खेळाडू बनला आहे. सर्वात वेगवान शतक ठोकण्याच्या बाबतीत डेव्हिड मिलर (38), युसूफ पठाण (37) आणि ख्रिस गेल (30) त्याच्या पुढे आहेत. ट्रॅव्हिस हेड आता हैदराबादसाठी सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू बनला आहे.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)