GT vs RCB, IPL 2024: आयपीएल 2024 चा 52 वा (IPL 2024) सामना शनिवार, 4 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात होणार आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या 10 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 7 गमावले आहेत. ते पॉइंट टेबलच्या तळाशी आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सची कामगिरीही काही विशेष झाली नाही. गिलच्या नेतृत्वाखालील संघाने 10 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. ते 8 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहेत. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केला जाईल. मोबाईलवर, जिया सिनेमा ॲपवर तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता. (हे देखील वाचा: MS Dhoni: एमएस धोनीने 103 वर्षाच्या चाहत्याला दिले एक स्पेशल गिफ्ट, पाहा व्हिडिओ)
The 𝙋𝙧𝙞𝙣𝙘𝙚 is back at Bengaluru for his payback against the 𝙆𝙞𝙣𝙜 👑
Catch the LIVE action from #RCBvGT, at 6:30 PM with #IPLonJioCinema, streaming FREE 👈#TATAIPL | @RCBTweets | @gujarat_titans pic.twitter.com/r0AyPOwA1s
— JioCinema (@JioCinema) May 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)