IND vs ENG 4th Test Day 2: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याला (IND vs ENG 4th Test) शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना रांचीमध्ये खेळवला जात आहे आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून अजेय आघाडी मिळवायची आहे. तत्तपुर्वी, पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 7 गडी बाद 302 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी शतक झळकावणारा जो रूट आज आपला डाव पुढे नेणार आहे. त्याच्यासोबत ऑली रॉबिन्सन क्रीजवर आहे. त्याआधी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आकाश दीपने रांची कसोटीतून भारतासाठी पदार्पण केले.
How many more runs will the visitors rack up on Day 2️⃣? 👀
Don't miss a moment of the action from #INDvENG 4th Test, LIVE starting at 8:45 AM on #JioCinema, #Sports18 & #ColorsCineplex. 👈#JioCinemaSports #BazBowled #IDFCFirstBankTestSeries pic.twitter.com/KflRgjNRzN
— JioCinema (@JioCinema) February 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)