न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउदी (Tim Southee) याला गुरुवारी सर रिचर्ड हॅडली पदक (Sir Richard Hadlee Medal) प्रदान करण्यात आले, जे एका कॅलेंडर वर्षातील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी देशातील सर्वोत्तम क्रिकेटपटूला दिले जाते. सध्या चालू असलेल्या आयपीएल-15 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे (Kolkata Knight Riders) प्रतिनिधित्व करणाऱ्या 33 वर्षीय साउदीला 2021 मध्ये देश आणि परदेशात कसोटी व मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले. साउदीने गेल्या वर्षी 23.88 च्या सरासरीने 36 कसोटी बळी घेतले होते. लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध 43 धावांत सहा बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)