इंडियन प्रीमियर लीग 2023 चा (IPL 2023) दुसरा क्वालिफायर सामना आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (MI vs GT) यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सची कमान हार्दिक पांड्याकडे असताना दुसरीकडे रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळताना दिसत आहे. दोन्ही संघांना अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर गुजरात टायटन्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 2 गडी गमावून 233 धावा केल्या. गुजरात टायटन्ससाठी सलामीवीर शुभमन गिलने 129 धावांची सर्वात शानदार खेळी खेळली. मुंबई इंडियन्सकडून पियुष चावला आणि आकाश मधवाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला 20 षटकात 234 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला तिसरा मोठा धक्का बसला. मुंबई इंडियन्स संघाचा स्कोर 73/2.
QUALIFIER 2. WICKET! 5.6: Tilak Varma 43(14) b Rashid Khan, Mumbai Indians 72/3 https://t.co/f0Ge2x8XbA #Qualifier2 #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)