RCB vs SRH: हैदराबादविरुद्ध शतक झळकवल्यानंतर 'या' पाकिस्तान खेळाडूने विराटचे केले कौतुक; म्हणाला- जागतिक क्रिकेटमधील खरा 'किंग'
विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) सनरायझर्स हैदराबादवर आठ गडी राखून महत्त्वपूर्ण विजय नोंदवला. या विजयामुळे आरसीबीला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यास मदत होईल.
विराट कोहलीने आरसीबीला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (RCB vs SRH) विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या लीगमधील विराट कोहलीचे (Virat Kohli) हे सहावे शतक आहे. या खेळीनंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने (Mohammad Amir) विराट कोहली हाच जागतिक क्रिकेटमधील 'एकमेव खरा राजा' असल्याचे मत व्यक्त केले आहे. विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) सनरायझर्स हैदराबादवर आठ गडी राखून महत्त्वपूर्ण विजय नोंदवला. या विजयामुळे आरसीबीला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यास मदत होईल. आयपीएलच्या इतिहासातील हा पहिलाच सामना होता जिथे दोन्ही बाजूंनी शतके झळकावली गेली, कोहलीने त्याचे सहावे शतक ठोकले, हेनरिक क्लासेनने 51 चेंडूत 104 धावा केल्या.
what a inning by one and only the real king @imVkohli take a bow. pic.twitter.com/3wOA8hj0Ki
— Mohammad Amir (@iamamirofficial) May 18, 2023
for video click the link pls😊.https://t.co/gI1E9s2jsj pic.twitter.com/CxQLzZGPFP
— Mohammad Amir (@iamamirofficial) May 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 19, 2023 10:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

