ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात (MPL 2023) बॅटने धुमाकूळ घातला आहे. त्याने चौकार आणि षटकारांची बरसात करत तुफानी अर्धशतक ठोकले. पुणेरी बाप्पाकडून तो कोल्हापूर टस्कर्सविरुद्ध (PB vs KT) मैदानात उतरला आणि आपल्या झंझावाती खेळीत 27 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकार मारत 64 धावा केल्या आणि पुण्याला विजय मिळवुन दिला. पण या सामन्या दरम्यान एक घटना असी घडली की ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घडले असे की ऋतुराज गायकवाडला भेटण्यासाठी त्याच्या चाहत्याने सुरक्षा घेरा मोडून मैदानात पोहचला आणि त्याच्या पाया पडला. त्याच्यानंतर प्रेक्षकांनीही केला एकच कल्लोळ सुरु केला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ
याला म्हणतात सुपर फॅन ❤️#MPL सामन्यात @Ruutu1331 ची भेट घेण्यासाठी चाहत्याने दाखवली चित्याची चपळाई
व्हिडिओ सौजन्य: अझर pic.twitter.com/j5oLB7t90C
— #MPL 🏏 (@MaheshMGW23) June 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)