IND vs BAN 1st: टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जहूर अहमद स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. टीम इंडियाने पहिल्या डावात 404 धावा केल्या होत्या. त्याचवेळी बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून मुशफिकर रहीमने सर्वाधिक 28 धावा केल्या. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 5 बळी घेतले. टीम इंडियाने वेगवान फलंदाजी करताना दुसरा डाव 258 धावांवर घोषित केला. सलामीवीर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने शानदार शतके झळकावली. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी 512 धावा कराव्या लागतील. दरम्यान, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने विकेट न गमावता धावा केल्या आहेत. बांगलादेशला विजयासाठी अजूनही 471 धावांची गरज आहे. सलामीवीर नजमुल हुसेन शांतो 25 आणि झाकीर हसन 17 धावा करून खेळत आहेत. बांगलादेशचा स्कोर 42/0 असा आहे.
That's Stumps on Day 3 of the first #BANvIND Test!
Bangladesh move to 42/0 after #TeamIndia secured a 512-run lead!
We will be back for Day 4 action tomorrow.
Scorecard ▶️ https://t.co/CVZ44NpS5m pic.twitter.com/scqMCXxlG2
— BCCI (@BCCI) December 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)