IPL 2024 Opening Ceremony: इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामाची सुरुवात आज म्हणजेच 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB vs CSK) यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. जिथे, सामना सुरू होण्यापूर्वी उद्घाटन समारंभ होईल. आयपीएलने उद्घाटन सोहळ्यासाठी बॉलिवूडच्या मोठ्या सेलिब्रिटींची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या यादीत प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आणि ज्येष्ठ गायक एआर रहमान यांचाही समावेश आहे. याशिवाय टायगर श्रॉफ आणि गायक सोनू निगम यांच्या नावाचा समावेश आहे. त्याचवेळी स्वीडिश डीजे एक्सवेल देखील दिसणार आहे. हा उद्घाटन सोहळा सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होईल. हा सोहळा JioCinema वर लाइव्ह स्ट्रीम केला जाईल. हा सोहळा 30 मिनिटे चालणार आहे. आयपीएल 2024 चा उद्घाटन सामना आज भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 वाजता चेन्नईच्या एमए चिदंबरम आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)