भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील दुसरा सामना (2nd T20) रविवारी लखनऊमध्ये (Lucknow) खेळवला जाणार आहे. भारतासाठी हा सामना करो किंवा मरो असेल. टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणारा दुसरा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07.00 वाजता सुरू होईल. नाणेफेक सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 6.30 वाजता होईल. टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या T20 सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या अनेक चॅनेलवर पाहता येईल. याशिवाय डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हॉटस्टारचे सदस्यत्व असलेले वापरकर्ते ऑनलाइन स्ट्रीमिंगद्वारे सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
Huddle time in Lucknow ✅
Gearing up for the second #INDvNZ T20I ??
Live - https://t.co/p7C0QbPSJs #INDvNZ @mastercardindia pic.twitter.com/cfWLO0IRV6
— BCCI (@BCCI) January 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)