IND vs ENG 3rd Test: टीम इंडिया राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळत आहे. राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निर्णय घेतला. दरम्यान, बीसीसीआयने एक मोठा अपडेट दिला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 चा भाग असलेला वेगवान गोलंदाज मुकेश कुमार संघाबाहेर आहे. राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघातून मुकेश कुमारला सोडण्यात आल्याचे बीसीसीआयने सोशल मीडियावर अपडेट दिले आहे. आता तो रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या बंगाल संघात सामील होणार असून रणजी ट्रॉफीचा पुढील सामना खेळताना दिसणार आहे. मात्र, तो पुन्हा टीम इंडियामध्ये सामील होईल, जिथे मालिकेतील चौथा सामना खेळला जाणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)