क्षेत्ररक्षक मैदानावर अनेक उत्कृष्ट झेल घेताना दिसले आहेत. दरम्यान, एका झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा आश्चर्यकारक झेल ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमधील आहे. हा झेल पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा झेल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये फलंदाज समोरच्या दिशेने शॉट खेळत आहे. पण 30 यार्ड जवळ उभा असलेला क्षेत्ररक्षक पटकन मागे धावतो. हा क्षेत्ररक्षक सीमेजवळ धावत गेला आणि झेल घेतला. या झेलची खास गोष्ट म्हणजे क्षेत्ररक्षक मागे लांबून पळत होता. यानंतर तो सीमारेषेला स्पर्श करू लागतो, पण नंतर चेंडू वर फेकतो. मग जवळच उभा असलेला क्षेत्ररक्षक सहज झेल घेतो. हा शानदार झेल पाहिल्यानंतर प्रेक्षक आणि फलंदाजही हैराण झाले. काही चाहत्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. (हे देखील वाचा: T20 International Cricket: टी-20 क्रिकेटमध्ये 'या' भारतीय फलंदाजांनी केला आहे कहर, मारले सर्वाधिक चौकार; येथे पाहा संपूर्ण यादी)
पाहा व्हिडिओ
WHAT A CATCH.....!!!!! 🔥🫡
- One of the greatest fielding efforts in cricket history. [Rob Moody]pic.twitter.com/1ScwmXBz5P
— Johns. (@CricCrazyJohns) January 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)