आज टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात T20 तिरंगी मालिकेचा अंतिम सामना खेळला जात आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा अंतिम सामना खेळला जात आहे. भारतीय महिला संघाने या मालिकेतील साखळी टप्प्यातील त्यांच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला, परंतु दोन्ही संघांमधील दुसरा सामना वॉशआउटमध्ये संपला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मालिकेतील तिसरा संघ वेस्ट इंडिजचा दोन्ही सामन्यात पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. महिला टी-20 विश्वचषकापूर्वी हे विजेतेपद पटकावण्यात भारताला यश आले, तर त्याला मोठी गती मिळेल. दरम्यान, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया: स्मृती मानधना, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्स, देविका वैद्य, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, राजेश्वरी गायकवाड, स्नेह राणा.
दक्षिण आफ्रिका: लॉरा वोल्वार्ड, तझमिन ब्रिट्स, लारा गुडॉल, सुने लुस (कर्णधार), क्लो ट्रायॉन, अॅनेरी डेर्कसेन, नदिन डी क्लर्क, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), शबनिम इस्माईल, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा.
🚨 Toss Update 🚨@ImHarmanpreet has won the toss & #TeamIndia have elected to bat against South Africa in Tri-series Final. #INDvSA
Follow the match ▶️ https://t.co/wiyKk2LjmH pic.twitter.com/UMhz6s5Jmz
— BCCI Women (@BCCIWomen) February 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)