आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाच्या (ICC Women's T20 World Cup) आठव्या आवृत्तीला शुक्रवारपासुन सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका खेळवला गेला असुन श्रीलंकाने या विश्वचषकात विजयाने सुरुवात केली आहे. विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघांचा समावेश करण्यात आला असून त्यात भारतीय संघाचेही नाव आहे. दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर टीम इंडियाच्या खेळाडूंच्या (Team India) फोटोशूटदरम्यानचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला चाहत्यांनी पसंती दिली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाला स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. 12 फेब्रुवारीला हे दोन्ही संघ केपटाऊनच्या मैदानावर आमनेसामने असतील.
पहा व्हिडिओ
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)