IND vs BAN Test Series 2024: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने (Team India) शुक्रवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर बांगलादेशविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी (IND vs BAN Test Series 2024) तयारी सुरू केली. भारत 19 सप्टेंबर रोजी येथे कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशचा सामना करून घरच्या हंगामाची सुरुवात करेल. पहिल्या सराव सत्रात, अनुभवी फलंदाज विराट कोहलीने नेटवर 45 मिनिटे घालवली, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही सराव करण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा, कोहलीसह संपूर्ण संघ येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर जमला. यावेळी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह नवे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल आणि सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर देखील उपस्थित होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)