IND vs USA, 25th Match: टी-20 विश्वचषक 2024 चा 25 वा सामना (T20 World Cup 2024) आज भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि यूएस राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs USA) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडिया आणि अमेरिका अ गटातील संघ आहेत. या दोन संघांसह पाकिस्तानचाही अ गटात समावेश आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून टीम इंडिया आणि अमेरिका पॉइंट टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
यूएसए: स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रियास गौस (विकेटकीपर), आरोन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शेडली व्हॅन साल्विक, जसदीप सिंग, सौरव नेत्रावलकर, अली खान.
🚨 Toss Update 🚨
Captain Rohit Sharma has won the toss & #TeamIndia have elected to bowl against USA.
Follow The Match ▶️ https://t.co/HTV9sVyS9Y#T20WorldCup | #USAvIND | @ImRo45 pic.twitter.com/WWgfs7NJRT
— BCCI (@BCCI) June 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)