IND vs BAN 2nd Test: टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिली कसोटी जिंकून टीम इंडियाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने एकही विकेट न गमावता 19 धावा केल्या होत्या. सलामीवीर केएल राहुल टीम इंडियाची कमान सांभाळत आहे. तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियात एक बदल झाला आहे. कुलदीप यादवच्या जागी जयदेव उनाडकटला संधी देण्यात आली आहे. बांगलादेशचा पहिला डाव 73.5 षटकांत 227 धावांत आटोपला. बांगलादेशकडून मोमिनुल हकने सर्वाधिक 84 धावा केल्या. टीम इंडियाकडून आर अश्विन आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. दरम्यान, लंचपर्यंत टीम इंडियाने तीन गडी गमावून 86 धावा केल्या आहेत. विराट कोहली 18 आणि ऋषभ पंत 12 धावांवर खेळत आहे. टीम इंडियाचा स्कोर 86/3 आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)