Virat Kohli Half Century: किंग कोहलीने पर्थ कसोटीत सावरले, शानदार अर्धशतक झळकावले; भारताची 431 च्या पुढे आघाडी
पर्थ कसोटीत दुसऱ्या डावात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अर्धशतक पुर्ण केले आहे. त्यासह भारताने 430 धावांची आघाडी घेतली आहे. भारताचा स्कोर 384/5
India National Cricket Team vs Australia Men's Cricket Team: भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy 2024-25) शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. रोहितच्या जागी जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. त्याआधी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने यजमानांवर आपली पकड घट्ट केली होती. दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी शानदार फलंदाजी करत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 172 धावा केल्या होत्या. दरम्यान, पर्थ कसोटीत दुसऱ्या डावात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अर्धशतक पुर्ण केले आहे. त्यासह भारताने 430 धावांची आघाडी घेतली आहे. भारताचा स्कोर 384/5
FIFTY!
A well made half-century by @imVkohli. His 32nd in Test cricket 👏👏
Fifth on Australian soil.
Live - https://t.co/gTqS3UPruo… #AUSvIND pic.twitter.com/05HG0XdJKu
— BCCI (@BCCI) November 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 24, 2024 01:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

