Sambhal Violence: संभलमधील जामा मशिदीत सर्वेक्षणावरून (Survey in Sambhal Mosque) सुरू झालेला गोंधळ वाढत चालला आहे. हिंसक परिस्थिती पाहून जिल्हा प्रशासनाने जामा मशिदीजवळील परिसर सील केला आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दुसरीकडे, सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 15 जणांना अटक केली आहे. मशिदीजवळील हिंसाचारात मृतांची संख्या तीन झाली (3 Dead in Sambhal Violence) आहे. (Train Derailment Attempt in UP: उत्तर प्रदेश मध्ये रेल्वे अपघाताचा प्रयत्न; पिलीभीत-बरेली रेल्वे रुळावर ठेवाल 25 फूट लोखंडी रॉड)
प्रशासनाने सर्वेक्षण सुरू करण्यापूर्वी न्यायालयाकडून मशिदीच्या इमामाची संमती घेण्यात आली होती. तरीही काहींनी मशिदीच्या परिसरात गोंधळ घातला. या हिंसाचारात सहभागी असलेले लोक तेथे नमाज अदा करण्यासाठी आले नव्हते. अशा परिस्थितीत हिंसाचारात सहभागी असलेल्या सर्वांची ओळख पटवली जात आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी तीव्र केले असल्याचे त्यांनी सांगितले.
15 जणांना अटक
या हिंसाचारात ओळख पटल्यानंतर पोलिसांनी 15 जणांना अटकही केली आहे. पोलिसांनी लाठीचार केल्यानंतर घटनास्थळी शांतता पाळण्यात आली आहे. संभल हिंसाचारानंतर पोलिस अधीक्षक कृष्ण कुमार विश्नोई यांनीही निवेदन दिले आहे. ते म्हणाले की, पाहणी पथक येताच एक जमाव जमा झाला आणि या जमावातील काही पुढे आले आणि त्यांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली. यामुळे चेंगराचेंगरीसारखी स्थिती झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
संपूर्ण परिसर सील
मिळालेल्या माहितीनुसार, मशिदीबाहेर हिंसाचार करणाऱ्या सर्व बेशिस्त घटकांची ओळख पटवली जात आहे. याशिवाय दगडफेकीसाठी चिथावणी देणाऱ्यांचीही ओळख पटवली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सध्या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.