TATA IPL 2025 Mega Auction LIVE: इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी खेळाडूंचा लिलावाला (IPL 2025 Mega Auction) सुरुवात झाली आहे. हा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया येथे पार पडत आहे. या मेगा लिलावात एकूण 577 खेळाडू आपले नशीब आजमावतील, त्यापैकी 367 भारतीय आणि 210 परदेशी खेळाडू आहेत. या मेगा लिलावात, सर्व 10 संघ एकूण 204 खेळाडूंवर बोली लावू शकतील, त्यापैकी जास्तीत जास्त 70 परदेशी आहेत. यावेळी मेगा लिलावात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळेल कारण अनेक स्टार खेळाडू या लिलावाचा भाग आहेत. आयपीएलच्या दहा संघांकडे 641.5 कोटी रुपये आहेत, तर पंजाब किंग्जचे सर्वाधिक बजेट 110.5 कोटी रुपये आहे. दरम्यान, भारताचा आघाडीचा फिरकी गोलंदाज, रविचंद्रन अश्विन, चेन्नई सुपर किंग्जला ₹ 9.75 कोटींना विकला गेला!.
पाहा पोस्ट -
India’s leading spinner, Ravichandran Ashwin, is sold to Chennai Super Kings for ₹9.75 crore! 💰
A grand homecoming for Ash Anna! 💛#IPL2025 #CricketTwitter pic.twitter.com/SlnE5d9fUz
— Sportskeeda (@Sportskeeda) November 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)