तमिम इक्बालने गुरुवारी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण आता निवृत्ती (Tamim Iqbal Retirement) असूनही, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांच्या सांगण्यावरून, तमिमने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे आणि आगामी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये बांगलादेशकडून भारतात खेळणार आहे. तसेच बांगलादेशी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे समजते आहे. तमीम इक्बालने एक दिवस अगोदर म्हणजेच 6 जुलै रोजी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तमिमने ढाका येथे पत्रकार परिषदेत आपल्या निर्णयाची माहिती दिली. निवृत्तीबद्दल बोलत असतानाच ते अचानक रडायला लागले. तमिमच्या या निर्णयाने बांगलादेश क्रिकेटमध्ये खळबळ उडाली होती.
🚨 Just in: After an intervention from Bangladesh’s Prime Minister Sheikh Hasina, Tamim Iqbal has withdrawn his decision to retire from international cricket#CricketTwitter pic.twitter.com/NRMtyxUEcc
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)