रविवार, 16 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup 2022) सुरुवात होत आहे. विश्वचषकासाठी सर्व संघ ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. T20 विश्वचषकापूर्वी भारतासह 16 संघांचे कर्णधार एकमेकांना भेटले. या दरम्यान रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि बाबर आझम (Babar Azam) एकत्र पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते. या पत्रकार परिषदेत बाबर आझमने रोहित शर्माबद्दल मोठी गोष्ट सांगितली. बाबर आझम म्हणाला की, रोहित शर्मा हा खूप वरिष्ठ खेळाडू आहे आणि तो त्याच्याकडून अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्याकडून जे काही शिकता येईल ते त्याच्यासाठी चांगले असेल. त्याचवेळी रोहित शर्मा म्हणाला की, आम्हा दोघांनाही भारत आणि पाकिस्तान सामन्याचे महत्त्व समजते. जेव्हा कधी आम्ही एकमेकांना भेटतो तेव्हा आम्ही घराबद्दल बोलतो. ते एकमेकांना विचारतात घरी सगळे कसे आहेत.
पहा व्हिडीओ
Lovely conversation between Rohit Sharma & Babar Azam ❤️#RohitSharma#BabarAzam#INDvsPAK#T20WorldCuppic.twitter.com/RAFZBPgQZ4
— Cricket Videos🏏 (@Crickket__Video) October 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)