ICC T20 विश्वचषक 2021 च्या (T20 World Cup) दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात पाकिस्तानचा  (Pakistan) सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक मोहम्मद हफीझने (Mohammad Hafeez) 8 व्या षटकात अत्यंत खराब चेंडू टाकला आणि ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नरने (David Warner) त्यावर जबरदस्त षटकार ठोकला. दुबईत (Dubai) टी-20 विश्वचषकमध्ये ऑस्ट्रेलियन डावादरम्यान हाफीजच्या हातून सुटलेला चेंडू दोन टप्पे घेत वॉर्नरपर्यंत पोहोचला. वॉर्नरनेही क्रीजच्या बाहेर येत चेंडूला सीमारेषेपार मिडविकेटवर प्रेक्षकांकडे पाठवले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)