ICC T20 विश्वचषक 2021 च्या 33 व्या सामन्यात अफगाणिस्तान (Afghanistan) आणि भारत (India) संघ अबु धाबी (Abu Dhabi) येथे आमनेसामने येणार आहेत. अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान (Rashid Khan) या सामन्यासाठी खूप उत्सुक दिसत आहे. खेळाडूंशिवाय अफगाणिस्तानचे चाहतेही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती होती. त्या सामन्यादरम्यान अनेक प्रेक्षकांकडे तिकीट नसतानाही जबरदस्तीने स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता खानने यावर नाराजी व्यक्त करत चाहत्यांना पुन्हा असे न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
I’m super excited about tomorrow’s AFGvIND game. I was disappointed at the scenes last weekend; we need to fly our national flag 🇦🇫 high & do our country proud. Pls respect rules & support the organisers @ICC @T20WorldCup @AbuDhabiCricket, only coming to the stadium with a ticket pic.twitter.com/GXsf1vSoiR
— Rashid Khan (@rashidkhan_19) November 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)