Swiggy-Zomato Troll Naveen-ul-Haq: विराट कोहलीसोबत झालेल्या वादानंतर लखनऊ सुपरजायंट्सचा गोलंदाज नवीन-उल-हक भारतीय चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. भारतीय चाहते या गोलंदाजाला सोशल मीडियावर ट्रोल करताना दिसतात. चेन्नई येथे बुधवारी IPL 2023 एलिमिनेटर सामन्यात क्षेत्ररक्षण करताना भारतीय चाहत्यांनी नवीन-उल-हकला चिडवण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एलिमिनेटर सामन्यात लखनऊच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध 81 धावांनी पराभव झाल्यानंतर नवीन-उल-हक सोशल मीडियावर अधिक ट्रोल होत आहे. आरसीबीचे चाहते नवीनला मजेदार मीम्स शेअर करत ट्रोल करत आहेत. नवीन उल हकचे आंब्यासोबतचे फोटो खूप शेअर केले जात आहेत. दरम्यान, स्विगी आणि झोमॅटोने देखील नवीनचे आंब्यासोबत मीम्स शेअर करून ट्रोल केलं आहे. (हेही वाचा -Mumbai Beat Lucknow: चेपॉकमध्ये मुंबईच्या मधवालची धूम, 3.3 षटकात 5 धावा देत घेतल्या 5 विकेट, जाणून घ्या सामन्याचा टर्निंग पॉइंट)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)