भारतीय फलंदाजीत सनसनाटीचा समानार्थी बनलेल्या सूर्यकुमार यादवने आपली तुलना एबी डिव्हिलियर्सशी का केली जाते हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. सूर्यकुमार यादवने क्रीझवर येताच भारतीय फलंदाजीच्या धावगतीला पंख दिले. 13व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर केएल राहुल (36) बाद झाला तेव्हा धावफलकावर भारताची धावसंख्या 94 धावा होती. पण अखेरच्या 7 षटकांत भारताने 98 धावांची भर घातली. यादरम्यान सूर्याची 68 धावांची खेळी अतिशय खास होती, ज्यामध्ये 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. या खेळीच्या बळावर सूर्यकमार यादवनेही या सामन्यात एक मोठा विक्रम केला. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंडवर टी-20 इंटरनॅशनलमध्ये भारतीयाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. या खेळीत त्याने अवघ्या 22 चेंडूत आपले अर्धशतकही पूर्ण केले.
He came. He hit. He made us #BelieveInBlue with a 5⃣0⃣.
How many 💙💙 for #SuryakumarYadav's ⚡️ knock?
DP World #AsiaCup2022 #AsiaCupT20 #TeamIndia #INDvHK pic.twitter.com/NSFrEqrbWV
— Star Sports (@StarSportsIndia) August 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)