Chandrayaan 3 चे यशस्वी सॉफ्ट लॅन्डिंग, तर भारत यावेळी World Cup 2023 जिंकणार! Mumbai Indians चे ट्विट झाले व्हायरल

मुंबई इंडियन्सने विश्वचषक आणि चांद्रयान मोहिमेची तुलना करणारे ट्विट केले आहे. खरं तर, 2019 मध्ये जेव्हा चांद्रयान-2 चंद्रावर पाठवण्यात आलं होतं, त्याच वर्षी आयसीसी विश्वचषकही खेळवण्यात आला होता. ज्यामध्ये भारताचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास निश्चित झाला.

Chandrayaan 3 चे यशस्वी सॉफ्ट लॅन्डिंग, तर भारत यावेळी World Cup 2023 जिंकणार! Mumbai Indians चे ट्विट झाले व्हायरल

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) ट्विट करून चांद्रयान-3 (Chandryaan 3) चा संबध विश्वचषक 2023 (World Cup 2023) शी जोडला आहे. ज्यामध्ये भारताने विश्वचषक जिंकण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबई इंडियन्सने विश्वचषक आणि चांद्रयान मोहिमेची तुलना करणारे ट्विट केले आहे. खरं तर, 2019 मध्ये जेव्हा चांद्रयान-2 चंद्रावर पाठवण्यात आलं होतं, त्याच वर्षी आयसीसी विश्वचषकही खेळवण्यात आला होता. ज्यामध्ये भारताचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास निश्चित झाला. इस्रोची चांद्रयान-2 मोहीम यावर्षी अयशस्वी झाली होती. त्याच वेळी, या वर्षी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात पूर्णपणे यशस्वी झाले आहे आणि या वर्षी विश्वचषक 2023 चे आयोजन देखील केले जात आहे, ज्याचे आयोजन भारत करणार आहे. अशा परिस्थितीत चांद्रयानच्या यशाचा आनंद साजरा करताना मुंबई इंडियन्सने त्याची तुलना क्रिकेट वर्ल्ड कपशी केली. टीम इंडियाने शेवटचा आयसीसी विश्वचषकही आपल्या यजमानपदी जिंकला होता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 24, 2023 12:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).