भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना विशाखापट्टणम येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडिया नवी सुरुवात करणार आहे. सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेचे नेतृत्व करणार आहे. तर, ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार मॅथ्यू वेड आहे. भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा जोश इंग्लिशने आपले वादळी शतक पूर्ण केले आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 179/2
HUNDRED BY JOSH INGLIS....!!!!
Maiden T20i century in just 47 balls by Inglish against India in India. What a power striking innings by Josh, a classy knock. pic.twitter.com/zPP6HIkGY7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)