आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) च्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना, भानुका राजपक्षेच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने 20 षटकात 6 गडी गमावून 170 धावा केल्या. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संघाच्या गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण राजपक्षे आणि हसरंगा यांच्यातील सहाव्या विकेटसाठी केलेली भागीदारी आणि त्यानंतर सातव्या विकेटसाठी चमिका करुणारत्नेसोबतची अर्धशतकी भागीदारी यामुळे श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यश आले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)