Indian National Under-19 Cricket Team vs Sri Lanka National Under-19 Cricket Team, ACC U19 Asia Cup 2024 Live Toss Update:  एसीसी अंडर-19 आशिया चषक 2024 चा दुसरा उपांत्य सामना आज भारतीय राष्ट्रीय अंडर-19 क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय अंडर-19 क्रिकेट संघ यांच्यात शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. ज्यात दोन विजय आणि एकात पराभव स्वीकारावा लागल आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा संघही तीन सामने खेळून तिन्ही सामने जिंकले आहेत. ब गटातील गुणतालिकेत श्रीलंका संघ सहा गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. विजेता संघ अंतिम फेरीत पोहोचेल. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार वीरन चामुदिथा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या रोमांचक सामन्यात दोन्ही संघ या दिग्गज खेळाडूंसोबत मैदानात उतरले आहेत.

भारत अंडर-19 संघ: आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ सी, मोहम्मद अमन (कर्णधार), केपी कार्तिकेय, निखिल कुमार, हरवंश सिंग (यष्टीरक्षक), किरण चोरमले, हार्दिक राज, चेतन शर्मा, युधाजित गुहा.

श्रीलंका अंडर-19 संघ: पुलिंदू परेरा, दुलानिथ सिगेरा, शरुजन षणमुगनाथन (विकेटकीपर), विमथ दिनसारा, लक्विन अबेसिंघे, कविजा गमागे, वीरन चामुदिथा, विहास थेवमिका (कर्णधार), प्रवीण मनीषा, न्यूटन रंजित कुमार, मथुलन कुगा.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)