पंजाबचा नियमित कॅप्टन शिखर धवन दुखापतग्रस्त असल्यानं सॅम करनकडे नेतृत्त्व देण्यात आलं होतं. सॅम करन आता मायदेशी गेल्यानं पंजाबचं नेतृत्त्व जितेश शर्मा करणार आहे. आज होणाऱ्या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ सनरायझर्स हैदराबादचा सामना करताना दिसून येणार आहे. हा सामना जिंकून सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी जाण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

सनरायजर्स हैदराबादः राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, नीतीश रेड्डी, हेनरिच क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, संवीर सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट, मयंक मारकंडे - सबटिट्यूड - ट्रेविस हेड

पंजाब किंग्ज: प्रभसिमरन सिंग, अर्थव तायडे, राइली रूसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (कर्णधार,यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत बराड़, हर्षल पटेल, राहुल चाहर, नाथन एलिस, अर्शदीप सिंग

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)