पाच वेळचे चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) विश्वचषक 2023 च्या (ICC World Cup 2023) दुसऱ्या उपांत्य फेरीत आज आमनेसामने आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाने बुधवारी न्यूझीलंडचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली असून आज जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाशी होणार हे निश्चित होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया लीग टप्प्यात आमनेसामने आले, तेव्हा टेम्बा बावुमाच्या संघाने कांगारूंना दणदणीत पराभव दिला. या रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिला मोठा धक्का बसला. सलामीवीर टेंबा बावुमा 0 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची धावसंख्या 1/1 आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)