Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज केशव महाराज (Keshav Maharaj यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. 22 जानेवारीला अयोध्येत श्री राम मंदिराचा अभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहलीसह (Virat Kohli) भारतीय क्रिकेटपटूंनाही आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा भारतीय वंशाचा खेळाडू केशव महाराजने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये केशव महाराज हात जोडून नमस्ते म्हणताना दिसत आहेत. केशव महाराजांनी सर्वांना सुख, शांती आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पाहा व्हिडिओ
— 💥 (@Johnsmaink) January 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)